न्युयार्क-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी मंगळवारी अधिकृतपणे बाल्ड ईगलला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी घोषित केले. पांढरे डोके, पिवळी चोच आणि तपकिरी शरीराने ओळखू येणारा ‘बाल्ड ईगल’ २४० वर्षांपासून राष्ट्राचे प्रतीक आहे. हा एक अतिशय शक्तिशाली पक्षी मानला जातो. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेला हा नवा राष्ट्रीय पक्षी मिळाला आहे.
राष्ट्रपतींचा ध्वज, लष्करी चिन्ह, यूएस चलन आणि सरकारी दस्तऐवजांसह त्याची प्रतिमा विविध अधिकृत वस्तूंवर आहे. तथापि, आत्तापर्यंत याला राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृत पद मिळाले नव्हते. या गरुडाचे मूळ उत्तर अमेरिकेचे आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 रोजी नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. यापूर्वी, अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बिडेन यांनी संसदेने त्यांना पाठवलेल्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती, ज्यामध्ये युनायटेड स्टेट्स कोडमध्ये बदल करून बाल्ड ईगलला राष्ट्रीय पक्षी म्हणून नाव देण्यात आले आहे. इतकी दशके अमेरिकेत सत्तेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या डोके, पिवळी चोच आणि तपकिरी रंग असलेल्या या पक्ष्याला अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अपेक्षित सन्मान मिळाल्याचे मानले जात आहे.