Home राष्ट्रीय काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा


जम्मू-काश्मीर (वृत्तसेवा) जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये आज सकाळी सुरक्षादलाला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रंही जप्त करण्यात आली असून बडगाममध्ये अजूनही काही दहशतवादी लपले आहेत का याचा शोध घेण्यात येतो आहे.

बडगाम जिल्ह्यातील गोपालपोरा येथील चादुरा गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी परिसरात पहाटेपासून शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान,दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले असून हे दोघंही कोणत्या अतिरेकी संघटनेशी संलग्न आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound