अमळनेर (प्रतिनिधी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप व काही संघटनांना शिवीगाळ करून त्या बाबतचा व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.तसेच भाजप व काही संघटनांनबाबत चुकीचे वक्तव्य केले होते. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. परंतु अमळनेर पोलिसांनी संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून परिस्थिती चिघळू दिली नाही. संबंधित तरुणाविरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे, तरी तमाम नागरिकांनी व सर्व संघटना यांनी सर्वत्र शांतता ठेवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर तसेच गोपनीय विभागाचे शरद पाटील यांनी कळविले आहे.