विचार वारसा गणेश मंडळाच्‍या देखाव्याने वेधले भाविकांचे लक्ष

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या गणेशोत्सवानिमित्त विविध देखावे मंडळांनी सादर केलेले आहेत. मेहरूण येथील विचार वारसा गणेश मंडळानेदेखील यंदा महिलांवरील विकृत मानसिकतेचा निषेध व्यक्त करून हि मानसिकता येते कुठून ? असा सवाल करीत उभारलेला देखावा लक्ष वेधून घेत आहेत.

शहरातील मेहरुण येथे रामेश्वर कॉलनीतील विचार वारसा फाउंडेशन गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख आहेत. तर मंडळाच्या अध्यक्षस्थानी आशिष राजपूत, सचिवपदी अभिजीत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. मंडळाच्या देखाव्यातून, महिलांसह लहान मुलींवर विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून अत्याचार केले जात आहेत. यासाठी स्त्री व पुरुष दोघांना समाज शिक्षण महत्वाचे असल्याचे देखावे प्रतिपादित करीत आहेत.

गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी यंदा ७ सदस्य समिती स्थापन करण्यात आली. कार्यकारिणीत मंडळाच्या अध्यक्षपदी आशिष राजपूत, उपाध्यक्ष मयूर डांगे, सचिव-अभिजीत राजपूत, कार्याध्यक्ष अमोल ढाकणे, दीपक सनसे, खजिनदार अजय मांडोळे, मंगेश मांडोळे, सदस्य- संकेत मस्कर, गौरव डांगे, आकाश राजपूत, राहुल पाटील, ऋषी राजपूत, मनीष चौधरी, आकाश तोमर,अक्षय गवई, लोकेश निकम,सोपान जाधव,चेतन राजपूत, दिपक तायडे, हर्षल बराटे यांची निवड करण्यात आली आहे.

Protected Content