यावल प्रतिनिधी । तालुक्यातील उंटावद येथील विविध कार्येकारी सोसायटीची वार्षिक सभा शुक्रवारी सोसायटीच्या कार्यालयात संस्थेचे चेअरमन शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यात सुरूवातीला श्रद्धांजलीचा कार्येक्रम झाला नंतर सचिव संजय महाजन यांनी सभेचे विषय वाचुन दाखवले व त्यावर चर्चाही करण्यात आली. तद्नंतर चिंचोली उंटावद सजाचे तलाठी निखील मिसाळ यांना उत्कृष्ठ तलाठी म्हणून मिळालेल्या पुरस्काराबद्द त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामसेवक गुरूदास चौधरी यांना पदोंन्नती मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. तर इयत्ता १२ वीत सुवर्णा सपकाळे ८५.६६% गुण मिळवून तिस-या क्रमांकाने उतीर्ण झाल्लाबद्दल व वर्षा पाटील ८३ः५०% भाग्यश्री कोळी ७७ः८३% ईश्वर इंगडे ६५% सुर्यभान सपकाळे ६५% तसेच इयत्ता १० वीत हर्षदा पाटील ७३ः६०% रूपाली कोळी ७३ः२०% नम्रता भिल ७१ः६०% निकीता बावीस्कर ६८ः२०% दुर्गा कोळी ६७ः८०% इर्फान कुर्बान तडवी ५८% विकास पाटील ५९% कृष्णा पाटील ५८% इतकी गुण मिळवून उतीर्ण झाल्याबद्दल या सर्वांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन शशीकांत पाटील, सेवानिवृत्त सचिव दिलीप पाटील, विवेक पाटील, साहेबराव पाटील, सेवानिवृत्त प्रा.विश्वनाथ पाटील, ग्रा.प.सदस्य डिगंबर सपकाळे, रामचंन्द्र सपकाळे, किशोर सपकाळे, कोतवाल सोळुंके, मधुकर पाटील, विकास पाटील, गोकुळ कोळी, एकनाथ पाटील, शांताराम पाटील, प्रकाश पाटील, संतोष लोहार, प्रमोद पाटील, शिपाई भिकन पाटील, पोपट पाटील, देवीदास पाटील, रविंन्द्र पाटील इ.सह ग्रामस्थ उपस्थीत होते. या कार्येक्रमाचे प्रास्तावीक विवेक पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन संजय महाजन यांनी केले.