जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | के. सी. ई.सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे पालकांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित पालकांना मागील वर्षात घेण्यात आलेल्या सर्व उपक्रम व कार्यक्रमांचे फोटो व व्हिडिओ तसेच पीपीटी द्वारा चित्रीकरण दाखवण्यात आले. त्यानंतर वर्ग शिक्षकांनी वर्षभरामध्ये घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी माहिती पालकांना दिली.
सभेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील सर्व तुकड्यांमधील एक अशा वर्ग प्रतिनिधींची पालक शिक्षक संघासाठी तसेच माता-पालक संघ व शाळा व्यवस्थापन समिती साठी निवड करण्यात आली. त्यात पालक शिक्षक संघामध्ये योगिता सपकाळे, सरला माळी, शुभम तांबट, पुष्पा बडगुजर, रूपाली चौधरी, सुभाष सूर्यवंशी, राजेश नाईक, लेखराज जोशी, सतीलाल पाटील, आशा गरुड, अभिजीत धर्माधिकारी, योगराज खैरनार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर विविध इयत्तांमध्ये मंथन तसेच एम टी एस या परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका धनश्री फालक यांनी यावेळी पालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रसंगी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते.