जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समस्त माजी सैनिक / विधवांना कळविण्यात येते की, जळगांव मध्ये सैनिकी मुलांचे वसतिगृह, मध्यवती शिवाजी पुतळयाजवळील, जी.एस मैदान, जळगाव येथे असून सदर वसतीगृहामध्ये एकूण 48 मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. तसेच सैनिकी मुलींचे वसतिगृह हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ, धुळे रोड, जळगांव येथे असून सदर वसतीगृहामध्ये सुद्धा एकूण 48 मुलींची राहण्याची व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात जे माजी सैनिक / विधवा जळगांव शहराच्या बाहेर राहतात व त्यांचे पाल्य जळगांव येथे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्या पाल्यांना या वसतीगृहात प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या पाल्यांना अती अल्प दरात सैन्याच्या रँक प्रमाणे भोजनखर्च आकारले जाते व विधवांच्या पाल्यांना सदर वसतीगृहामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येतो.
प्रवेश जागा शिल्लक राहील्यास इतर नागरिक पाल्यांना नियमानुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी प्रवेश पुस्तीका / अर्ज वसतीगृह अधिक्षक/अधिक्षीका व कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. तरी इच्छुक माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधिक्षक / अधिक्षिका यांचेकडून प्रवेश पुस्तीका / अर्ज खरेदी करुन आपला अर्ज त्यांचेकडे दिनांक 31 ऑगष्ट 2024 पर्यंत सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोपान कासार, , जळगांव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी खालील नमुद दुरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय रा. गायकवाड, , मो. नं. ८४५९६८७३८८ दूरध्वनी क्र. ०२५७- २२४१४१४. अशासकीय वसतीगृह अधिक्षक समाधान धनगर, मो. नं. ७३७८९४२३२७ व दूरध्वनी क्र. ०२५७-२२३३०८८. अशासकीय वसतीगृह अधिक्षीका श्रीमती अनिता पाटील, मो. नं. ७५०७९०३९२१ किंवा दूरध्वनी क्र. ०२५७- २२४१४१४.