भुसावळ येथे एका फरार आरोपीस अटक तर दुसऱ्याने केले पलायन

WhatsApp Image 2019 04 20 at 1.06.57 PM

भुसावळ (प्रतिनिधी) बाजार पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री गस्त घालत असतांना पोलिसांना फरार आरोपी शहरात आले असल्याची गुप्त माहितीमिळाली असता दोघांपैकी एकास अटक केली तर दुसरा पळून जाण्यास यशस्वी झाला आहे.  अटक केलेल्या गुन्हेगाराने ते शहरात मोठे कांड करून पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती दिली असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.

 

स.फौ.अंबादास पाथरवट, पो. ना. सुनिल थोरात,  दिपक जाधव,  नरेंद्र चौधरी पो.काँ कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, विकास सातदिवे,  राहुल चौधरी,  बापुराव बडगुजर  यांचे पथक  भुसावळ बाजर पेठ पो.स्टे हदीत रात्रगस्त करीत असतांना भुसावळ शहर पो.स्टेचा फरार आरोपी विनोद लक्ष्मण चावरीया रा.वाल्मीक नगर व नंदुरबार लोहमार्ग पो.स्टे व अमळनेर पो.स्टे येथील विविध गुन्हयातील फरार आरोपी राकेश वसंत चव्हाण रा. अमळनेर हे दोघे जण भुसावळ शहरात घरफोडी व चोरी करण्याच्या इरादयाने शहरात आले असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.  या माहितीनुसार पो.अधिक्षक पंजाबराव उगले, पो. उपअधिक्षक लोहीत मतानी,  उप.पो.अधिकारी गजानन राठोड,  पो. निरीक्षक देविदास पवार, भु.बा.पेठ पो.स्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व पोलीस कर्मचारी भु.बा.पेठ पो.स्टे हदीती आरोपीतांचा शोध घेवु लागले. त्यावेळी शहरातील पंढरीनाथ नगर भागात  रात्री ३.३० वा.सुमारास दोन इसम हे संशयीतपणे जातांना पथकाला दिसले. त्यांना कोण आहे थांबा म्हणताच ते पोलीसांना पाहुन पळु लागले. यावेळी पोलिसांनी विनोद चावरिया यास ओळखले. विनोद थांब पळु नको अशा आरोळ्या मारुन त्याच्या मागे पो.काँ उमाकांत पाटील, राहुल चौधरी अश्यांनी त्याचा पाठलाग केला. परंतु, तो गल्ली बोळाचा फायदा घेवुन पळुन गेला.

गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे जप्त 

दुसरा झसम याच्या मागे पो.ना.दिपक जाधव पो.काँ कृष्णा देशमुख आदीं पाठलाग करीत असतांना तो इसम पळतांना दोन ठिकाणी पडला. त्याने उठुन त्याच्याजवळ असलेली  गावठी रिव्हाल्वर पो. काँ कृष्णा देशमुख यांच्याकडे करुन रुक जावो नही तो मे तुम्हें जान से मार डालुगां अशी धमकी दिली. तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर करुन त्यास ताब्यात घेतले.  तेव्हा त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राकेश वसंत चव्हाण (वय-30) रा.बंगाली फाईल प्रताप काँलेज जवळ अमळनेर असे सांगितले. त्याच्याजवळ  ५००० रुपये किमतींचा एक गावठी कट्टा, १०००  रुपये किंमतींचे दोन जिवंत गावठी काडतुसे मिळून आले.  तसेच राकेश वसंत चव्हाण याच्याबाबत अमळनेर पो.स्टे ला फोन करुन माहीती घेतली असता त्याच्या विरुद्ध अमळनेर पो.स्टे ला विविध प्रकारचे ७ तर नंदुरबार लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे ३ गुन्हे दाखल असून तो ८ ते ९ महिन्यापासुन फरार आहे अशी माहीती मिळुन आली.  राकेश चव्हाण हा गैरकायदा एक गावठी रिवाल्वर व दोन जिवंत काडतुस बागळतांना मिळुन आला व विनोद चावरीया हा पोलीसांना पाहुन पळुन गेला म्हणुन या दोघांविरुद्ध भुसावळ बाजर पेठ पो.स्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हयाचा तपास सहा.पो.नि. सारीका खैरनार करीत आहेत.  तसेच आरोपी राकेश चव्हाण याची सखोल विचारपुस केली असता त्याने सांगितले की आम्ही भुसावळ शहरात एक मोठ कांडकरुन पोलीसात हजर होणार होतो अशी माहीती दिली आहे त्या दिशेने तपास चालु आहे.

 

Add Comment

Protected Content