पाचोरा (प्रतिनिधी) येथील मतदारसंघातील आमदार किशोर पाटील यांचे वडील धनशिंग ओंकार पाटील यांचे २ फेब्रुवारी २०१७ रोजी निधन झाले होते. त्यांनी आयुष्यात सतत ५१ वेळा पंढरपूरला पायी जावून वाऱ्या केल्या होत्या. त्यांच्या स्मरणार्थ आ. पाटील दर महिन्याच्या २ तारखेला मतदार संघातील वारकरी, किर्तनकार अशा ५१ ज्येष्ठ नागरिकांना एकादशीनिमित्त सोडतीद्वारे नावाच्या चिठ्या काढून पंढरपूर वारीला पाठवत आहेत. या सगळ्यांच्या वाहन, जेवण, नास्ता व राहण्याची व्यवस्था आमदारांतर्फे करण्यात येत असते. या च अंतर्गत १ मार्च रोजी येथील शिवतीर्थ चिंतामणी कॉलनीतून रात्री ८.०० वाजता माजी नगराध्यक्षा सुनिता पाटील, आमदार किशोर पाटील यांच्या मातोश्री श्रीमती नर्मदाबाई धनशिंग पाटील यांनी वाहनपुजन करून व हिरवी झेंडी दाखवून वारकऱ्यांना रवाना केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अँड दिनकर देवरे, नगरसेवक राम केसवाणी, भरत खंडेलवाल, आमदार पाटील यांचे स्विय सहाय्यक राजु पाटील, भागवत पाटील व नाना वाघ उपस्थित होते.
१ मार्च रोजी यात्रेला गेलेल्यांमध्ये साहेबराव पाटील (जारगांव), भगवान तेली (खडकदेवळा), संभाजी जगदाळे, अरुण माळी, राजेंद्र भगत (कुऱ्हाड), योगेश सिरसागर (कोल्हे), माणीक शिंपी, मोतीलाल कुंभार, जिजाबाई चौधरी, गोविंदा चौधरी, बेबाबाई कुंभार, कैलास धनगर, कमलबाई गायकवाड (लोहारा), बाबुराव सुर्यवंशी (माहेजी), प्रकाश बोरसे (नांद्रा), सुमनबाई राऊळ (नगरदेवळा), यमुनाबाई हाटकर, बेबाबाई हाटकर, शोभाबाई महाजन, कमलबाई शेळके, (पाचोरा), सुवर्णा चव्हाण, सुधाकर शिंदे, शोभाबाई शिंदे, जनाबाई शिंदे, अनिता चव्हाण, (आंबेवडगांव), बबन पाटील (भातखंडे), अरुण गुरव, बाजीराव पाटील, मांगीलाल पाटील, (गाळण), प्रल्हाद पाटील, भिका पाटील, (गोरागखेडा), सुमित्रा पाटील, आनंदा पाटील, (चिंचपूरा), ज्ञानेश्वर राउत, (निंभोरी), उषाबाई पाटील (पिंपळगाव हरे), जगन पाटील, मथूरा पाटील, (शिंदाड), दिलीप पाटील, मंगलाबाई पाटील लिलाबाई शिंपी, (जारगाव), नाना हाटकर पाचोरा, सरला पाटील, लताबाई पाटील (सारोळा), उषाबाई परदेशी सावखेडा, सखुबाई पाटील, दशरथ पाटील, तारखेडा, गुलाब पाटील वाणेगांव अशा ५१ भाविकांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत सेवेसाठी उपतालुकाप्रमुख भागवत पाटील व प्रभाग क्रमांक आठचे स्वंयमसेवक बंडू सोनार यांना पाठवण्यात आले आहे.
पहा – वारकर्यांना रवाना करतांनाचा व्हिडीओ.