सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूरतर्फे आयोजित दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन १९ आणि २० एप्रिल २०२५ ला नागपूर येथे होणार असल्याची माहिती केंद्रीय अध्यक्ष डॉ. अजीज नदाफ, सचिव अय्यूब नल्लामंदू व संयोजक तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जावेद पाशा कुरेशी यांनी एका पत्रकाद्वारे जाहिर केली आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड, स्मरणिका प्रकाशन आणि इतर जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी लवकरच एक बैठक आयोजित केली जाणार आहे. हे संमेलन अखिल भारतीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेसह भारतीय मुस्लिम परिषद, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, छवी पब्लिकेशन्स, आणि हिंदी साहित्य परिषद यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद विविध साहित्यिकांशी संवाद साधत आहे. यापूर्वी १९९२ मध्ये नागपुरातच दुसरे साहित्य संमेलन प्रा. जावेद पाशा कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. अजीज नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले होते. आता पुन्हा एकदा नागपूरला दहावे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे.
संमेलनासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा:
मुख्य संयोजक: प्रा. जावेद पाशा कुरेशी, नागपूर – ८४५९५६३४८९ / ९४२२१५४२२३
उपाध्यक्ष: डॉ. इ. जा. तांबोळी – ९८९०९१९११८
सचिव: अय्यूब अलतीफ नल्लामंदू – ९७६६८१९९८१
खजीनदार: हसीब नदाफ – ९३२६६२६४०८
साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.