जळगाव (प्रतिनिधी) :सुशिक्षीत बेरोजगारांच्या प्रश्न व पेट्रोल-डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात थाळीनाद करून घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीने सुशिक्षीत बेरोजगारांना मोदी सरकारने दरवर्षीला दोन कोटी नोकऱ्या देऊ अशी घोषणा केली होती. पाच वर्षे उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्वरीत युवकांना राज्य व केंद्र सरकारने नोक-या उपलब्ध करून द्याव्यात. सुशिक्षीत बेरोजगारांना बँकेतून मुद्रा लोन मिळत नाहीत. रासायनिक खतांच्या किमतीत झालेली वाढ त्वरीत थांबवून मागील किमतीत शेतक-यांना उपलब्ध करून द्याव्यात. काल, परवा झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ त्वरीत कमी करून सर्व सामान्यांना परवडेल अशा भावात उपलब्ध करून द्यावेत. पाटबंधारे मंत्री, पालकमंत्री गिरीष महाजन हे जळगाव जिल्ह्याचेच असून शेतकऱ्यांच्या पाझर तलावाकरीता अधिग्रहीत झालेल्या जमीनीचा मोबदला त्वरीत वर्ग करण्यात यावेत. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी त्वरीत करण्यात यावीत, आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे , जिल्हाध्यक्ष ललित बागुल, संदीप पाटील, अभिषेक पाटील, सत्यजित सिसोदे, नामदेवराव चौधरी, योगेश देसले, रोहन पाटील, मजहर पठाण, चंद्रशेखर सातदिवे, अरविंद मानकरी, वाय .एस. महाजन, वाल्मिक पाटील, निला चौधारी, माधुरी पाटील, डॉ. एश्वरी यश राठोड, कल्पना पाटील, रोहन सोनवणे आदी उपस्थित होते.