मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडी एकत्र नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या आधी देखील उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील केजरीवाल यांच्या विरोधातील भूमिकेला विरोध दर्शवला होता. तसेच दैनिक सामनाच्या माध्यमातून देखील काँग्रेसचे कान टोचण्यात आले होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी २०२४ मध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने गुरूवारी ५ फेब्रुवारी रोजी होणार्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसऐवजी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.