रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रावेर नगरपालिकेवर संताप मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. रावेर शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, सांडपाण्याच्या गटारांचे तुंबणे आणि शहरातील स्वच्छतेचा अभाव यामुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याशिवाय, गावामध्ये रस्त्यावर पथदिवे पुरेशे नसल्याने रात्री चालणे अवघड झाले आहे.
सावदा रोड ते विश्रामगृह पर्यंत रस्त्यावर पथदिवे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी रावेर नगरपालिकेवर संताप मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्चाचे आयोजन सोमवार, ५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजता पाराचे गणपती मंदिर, रावेर येथे करण्यात आले आहे. निवेदन देताना शिवसेना जिल्हा समन्वयक प्रल्हाद महाजन, उपतालुकाप्रमुख नितीन महाजन, शिवसेना शहर प्रमुख राकेश घोरपडे, अशोक शिंदे, गोपाल मिस्तरी, तुषार निंबाळकर, वशिम खान आणि भावलाल महाजन उपस्थित राहणार आहेत. रावेर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.