खा. संजय राऊतांच्या दौऱ्यानिमित्त ठाकरे गटाची बैठक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानिमित्त शिवसेना जळगाव महानगरची बैठक महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 

खासदार संजय राऊत हे दिनांक 21 ते 23 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा यशस्वी कसा होईल यासाठीच्या नियोजनासाठी आज रोजी शिवसेना जिल्हा कार्यालय या ठिकाणी शिवसेना जळगाव महानगर च्या पदाधिकाऱ्यांचे बैठक महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार संजय राऊत यांचा जळगाव शहरात मेळावा होत असल्याने तो यशस्वीतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावे व खासदार राऊत यांचा दौरा यशस्वी करावा असे आवाहन शरद तायडे यांनी केले.

याप्रसंगी अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकिर पठाण, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, उपमहानगर प्रमुख निता सांगोळे, शारदा तायडे, जया तिवारी, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, मानसिंग सोनवणे, विभाग प्रमुख किरण भावसार, संजय सांगळे, पुनम राजपू,त युवा सेना महानगरप्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे, हर्षल मुंडे, ईश्वर राजपूत, मनोहर लखवाणी, कलीम खान, अहमद खान, डॉ. अशपाक पिंजारी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Protected Content