चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपड्याच्या राजकारणात दुदैवी घटना झाली आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रभाकर अप्पा सोनवणे यांना प्रचारासाठी घरातून निघताना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना जळगावातील रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रभाकर सोनवणे हे गुरूवारी जळगावातून चोपड्याला निवडणूकीच्या प्रचारासाठी जात होते. वाटेतच त्यांना ममुराबाद गावाजवळ गाडीतच हृदयविकाराचा झटका आला. हे पाहून त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते घाबरले. पण त्यांनी तात्काळ त्यांना जळगाव येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मिळाली आहे. डॉक्टरांनी प्रभाकर सोनवणे यांच्यावर अँजोप्लास्टी केली आहे. त्यात त्यांना 2 ब्लॉकेज आढळल्याची माहिती आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्यी रणधुमाळीत ही घटना घडल्यामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.