बोदवड तालुक्यात ठाकरे गटाला खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बोदवड तालुकाध्यक्ष गजानन खोडके यांच्यासह बोदवड तालुक्यातील पदाधिकारी यांनी शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थितीत त्यांच्या निवास्थानी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर बोदवड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन खोडके यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसह शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गजानन खोडके, असलम शेख, संजय महाजन, इस्राईल शेख शिंदे गटात पक्ष प्रवेश सोहळा केला आहे.

याप्रसंगी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन अल्पसंख्यांक आघाडीचे अफसर शेख, उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, सोशल मीडिया प्रमुख शिवराज पाटील, मुक्ताईनगरचे तालुकाप्रमुख नवनीत पाटील, बोदवड तालुकाप्रमुख प्रमोद धामोडे, बोदवड शहर प्रमुख गणेश टोंगे, हर्षल बडगुजर, राजेशशेठ ननवणी, बोदवड शहरप्रमुख दिनेश माळी, बोदवडचे उपनगराध्यक्ष संजय गायकवाड, सुनील बोरसे, विजय पाटील, राहुल शर्मा यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content