यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात सातत्यपूर्ण तसेच दैदिप्यमान कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचात दिवसेंदिवस नवनवीन खिताब रोवण्याचा विडा उचलून कार्य करणाऱ्या त्याचबरोबर आपल्या गायन शैलीच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात नावलौकिक मिळविलेले डॉ.डिगंबर सीताराम तायडे यांनी आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत तसेच “आता आभाळच असे आम्हा ठेंगणे” हे ब्रीद सार्थ ठरवीत डॉ. डिगंबर तायडे यांनी महाराष्ट्राच्या शरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. दरम्यान डॉ. डिगंबर तायडे यांची कामगिरी सतत उंचावत असून त्यांच्या कामगिरीची दखल घेत डॉ.डिगंबर तायडे यांना टीजीआय Group of Companies द्वारे आयोजित टीजीआय National Excellence Award 2025 या गौरवशाली पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
सदरील सोहळा नाशिक येथील माहेश्वरी भवन येथे महाभारतातील द्रोणाचार्य प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते सुरेंदर पाल सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने भावनिक भजनाने सुरुवात करण्यात येऊन कार्यक्रमामध्ये एक अध्यात्मिक वातावरण निर्मिती करण्यात आली.यावेळी आपल्या कतृत्वपूर्ण कामगिरीने महाराष्ट्रात नावलौकिक मिळविलेल्या कतृत्ववान व्यक्तींच्या गौरव सोहळ्याचे यानिमित्ताने आयोजन करण्यात आले.यात डॉ.डिगंबर तायडे यांचा देखील TGI National Excellence Award 2025 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.सदरहू डॉ.डिगंबर तायडे यांनी सदर पुरस्कार प्राप्त करून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्याची जबाबदारी पुन्हा पार पडली आहे हे विशेष !.प्रसंगी महाभारत मालिकेत द्रोणाचार्य यांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते सुरेंदर पाल सिंग यांच्यासह स्टेट जीएसटीचे जॉइंट कमिशनर दीपक वैष्णव,केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर,ओएमजी बुक्स ऑफ रेकॉर्डसचे संस्थापक आणि सिईओ दिनेश गुप्ता,कोटक बँके नाशिक ब्रांचचे विभागीय प्रादेशिक व्यवस्थापक दिलीप आहेर,आर्ट ऑफ लिविंगचे शरद डोल्हारकर,केंद्रीय पत्रकार संघटना स्पेशल इन्वेस्टीगेशन विभागाचे राष्ट्रीय प्रमुख जिथेश पठाथरी व सेक्रेटरी शैलेश सिंह यांची प्रमुख उपस्थिती राहीली.
दरम्यान गायनाच्या माध्यमातून दिवसेंदिवस एकामागून एक खिताब आपल्यासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून महाराष्ट्राचे नाव देशात नव्हे तर परदेशात गाजविणारे तसेच जळगाव जिल्ह्यातील व यावल तालुक्यातील डोंगर कठोरा या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या एका लहानशा खेडेगावातील मुळ रहिवाशी व सध्या डोंबिवली येथे वास्त्यव्यास असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधीकरणाचे सीव्हील इंजिनिअर डॉ.डिगंबर सीताराम तायडे यांना TGI National Excellence Award 2025 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले असून सदरील घटना महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात भर टाकणारी व महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचविणारी ठरली आहे.सदरील पुरस्कार डॉ.डिगंबर सिताराम तायडे व शकुंतला डिगंबर तायडे या दोघांनी हा पुरस्कार स्वीकारला.त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल डॉ.डिगंबर सीताराम तायडे व शकुंतला डिगंबर तायडे यांचे महाराष्ट्र भरातून तसेच देशभरातून व विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.तर “आता आभाळच असे आम्हा ठेंगणे” हे ब्रीद सार्थ ठरवीत डॉ.डिगंबर तायडे यांनी ‘हम किसीसे कम नही’ हि ओळख जगासमोर निर्माण केली आहे.