तलवार घेवून दहशत माजविणाऱ्याला अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरातील तडवी गल्लीत लोखंडी तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणावर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश जगदीश सोनवणे वय 26 राहणार तडवी गल्ली हरी विठ्ठल नगर जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील तडवी गल्लीत संशयित आरोपी नरेश सोनवणे हातात तलवार घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पथकाने बुधवारी 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कारवाई करत नरेश सोनवणे यांच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुरलीधर धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नरेश सोनवणे यांच्यावर रात्री 10 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.

Protected Content