Home राष्ट्रीय शोपियामध्ये दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न उधळला

शोपियामध्ये दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न उधळला

0
31


श्रीनगर वृत्तसंस्था । पुलवामानंतर रात्री नऊच्या सुमारास शोपिया येथे पोलीस चौकीवर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला असून पोलीसांनी केलेल्या गोळीबाराने अतिरेकी पळून गेले आहेत.

आज पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे लष्कराने जम्मू-काश्मिरात व्यापक प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. दरम्यान, यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास शोपिया जिल्ह्यातील एका पोलीस चौकीवर अतिरेक्यांनी गोळीबार करून हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी गोळीबार करून याला जोरदार प्रत्युत्तर दिल्यामुळे दहशतवादी पळून गेले. दरम्यान, पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा झालेल्या जवानांची संख्या ४४ झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound