भयंकर घटना : आगीच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या रेल्वेतून उड्या; तेवढ्यात ट्रेनने प्रवाशांना उडविले

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेसला अचानक आग लागल्यामुळे ती पाचोरा ते परधाडे गावाच्या दरम्यान थांबविण्यात आली. आग लागल्यामुळे काही प्रवाशांनी उड्या घेतल्या. त्यावेळी अचानक भरधाव येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस रेल्वे रुळावर उभे असलेल्या १५ ते २० जणांना उडविल्याची धक्कादायक घटना बुधवारी २२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पाचोरा ते परधाडे गावादरम्यान पुष्पक एक्सप्रेस जात असताना अचानक रेल्वे डब्याला आग लागली. त्यामुळे पुष्पक एक्सप्रेस ही जागेवर थांबली. त्यानंतर काही प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या घेतल्या. तेवढ्यात कर्नाटक एक्सप्रेसने रेल्वे रूळावर उभे असलेल्या १५ ते २० जणांना उडवल्याची धक्कादायक घटना बुधवारी २२ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी रवाना झाले आहे. तसेच या अपघातामध्ये मयत झालेल्यांचे मृतदेह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

Protected Content