Home क्राईम शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात !

शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात !


पुणे-वृत्तसेवा | इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयच्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसच्या परतीच्या मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे अपघात झाला असून प्राथमिक माहितीनुसार यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर शिक्षक व विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बावडा श्री शिवाजी विद्यालय शैक्षणिक सहल (ता.19) रोजी रात्री गणपती पुळे येथे गेली होती.त्यानंतर आज गुरुवार (ता.21) रोजी सहल पहाटे परतत असताना माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती लगत सहलीची एस. टी बस (क्रमांक एस टी क्रमांक एम एच 14 बी टी 4701) व टेम्पो यांची धडक झाली.

यावेळी बसमध्ये चालक, 2 पुरुष व 2 महिला असे एकूण 4 शिक्षक व 40 विद्यार्थी होते. या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर अन्य शिक्षक व विद्यार्थी जखमी झाले असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजत आहे


Protected Content

Play sound