पहूरजवळ भीषण अपघात; उभ्या कारला ट्रकची जोरदार धडक!

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी ७ वाजता भीषण अपघाताची घटना घडली. साई तोलकाट्याजवळ उभ्या असलेल्या मारुती सियाज गाडीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

भुसावळ येथील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक रवींद्र सपकाळे हे त्यांच्या मारुती सियाज कारने (एमएच १९ सीजे बी ७७७) संभाजीनगरहून भुसावळकडे येत होते. पहूर येथे साई तोलकाट्याजवळ लघुशंकेसाठी त्यांनी गाडी थांबवली. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने (एमएच २१ एक्स ७८६८) त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Protected Content