यावल प्रतिनिधी । सोशल मीडियावर धार्मिक एका धर्माच्या भावना दुखावणारी क्लिप टाकल्याने येथे मध्यरात्रीच्या सुमारास तणाव निर्माण झाला.
याबाबत वृत्त असे की, एका धर्माच्या भावना दुखावणारी क्लिप शहरातील एकाने सोशल मीडियात प्रसारित केल्याचे आढळून आले. यामुळे येथील एका गटातर्फे संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यात सुमारे दोन तास शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत कार्यवाहीची मागणी केली. सरम्यान, प्रभारी पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी संबंधितावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मध्यरात्री हा तणाव निवळला.
विशेष म्हणजे सायंकाळीच येथील पोलीस स्थानकातर्फे सोशल मिडीयावरील अफवा, धार्मीक भावना दुखावणार्या पोस्ट आदींमुळे शहरात तणाव निर्माण होवू नये म्हणून सर्वधर्मीय नागरीकांची शांतता समितीची बैठक आयोजीत केली होती. बैठक संपून दोन तासही होत नाहीत तोवर ही घटना घडली. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.