रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-यावल विधानसभेतुन निवडणुक लढवण्यासाठी दहा इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले आहे. अशी निवडणुक निर्णय अधिकऱ्यांनी दिली आहे. रावेर – यावल विधानसभेसाठी निवडणुक अर्ज विक्रीला सुरूवात झाली आहे.
पहिल्याच दिवशी रावेर शहराचे माजी नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, खिरोदा येथिल धनंजय शिरीष चौधरी, फैजपुर येथिल शेख कुर्बान शेख करीम, रावेर येथील डी डी वाणी, नुर मोहोम्मद तडवी, प्रशांत बोरकर, रशिद तडवी कुसुंबा, संजय चौधरी रसलपुर, परसाळे येथिल सकीला महेमूर तडवी इत्यादी दहा इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज आज घेतले आहे.