Home Cities जळगाव खड्डेमय रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती; सागर पाटील यांचा पुढाकार

खड्डेमय रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती; सागर पाटील यांचा पुढाकार

0
159


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रेम नगर, बजरंग पूल आणि बीजे नगर परिसरातील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून खड्डेमय रस्त्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रस्त्यांवरून चालणे धोकादायक बनले होते. या गंभीर समस्येची दखल घेत भावी नगरसेवक सागर जिजाबराव पाटील यांनी स्वखर्चाने या खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महापालिका प्रशासनाकडून या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे वेळोवेळी दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. अशा परिस्थितीत, नागरिकांच्या अडचणी ओळखून सागर पाटील यांनी मित्र परिवाराच्या मदतीने हे काम पूर्ण केले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. या कामात कल्पेश मालपाणी, अल्पेश न्याती, समीर तडवी, बंटी वाणी, दीपक पाटील, अथर्व पाटील, दीपक वाणी आणि सिद्धार्थ कोलते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सागर पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून या कामावर लक्ष ठेवले. त्यांच्या या कृतीमुळे आता पुढील नगरसेवक म्हणून त्यांचे नाव परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेत आले आहे. “महापालिकेने दुर्लक्ष केलेले काम सागर पाटील यांनी पुढाकार घेऊन केले, हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे,” असे मत एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केले.

याप्रसंगी बोलताना सागर पाटील म्हणाले, “समाजातील प्रश्न सोडवणे हीच खरी सेवा आहे. नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवणे ही माझी प्राथमिकता आहे.” या कामामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, ज्येष्ठ नागरिकांनीही आता महापालिका प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound