जळगाव प्रतिनिधी । शहरातील तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे समाजातील विशेष प्राविण्य प्राप्त सदस्य व गुणवंत विद्यार्थी सत्कार आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून तेली समाजातील विशेष प्राविण्य प्राप्त सदस्य व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन केले जाते. यावर्षीचा सदर कार्यक्रम आज रविवार २९ रोजी ३ वाजता तेली समाज मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी ३०० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी आपल्या भाषणात शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले की, आई-वडिलांनी लहानपणी दिलेले संस्कार आपल्या दैनंदिन जीवनात अंगिकारल्यास भविष्यात आपल्याला नोकरी, व्यवसायात आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मोलाची मदत होते म्हणून ज्येष्ठांचा नेहमी आदर करा. तसेच धुळे, तेली समाज महासभा अध्यक्ष बबनराव चौधरी व चोपडा येथील उद्योगपती जीवन चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष आण्णासो आर. टी. चौधरी यांनी करताना विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सुत्रसंचालन सचिव नारायण चौधरी यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर गणेश चौधरी, प्रताप चौधरी, राजेंद्र चौधरी , सुरेशआण्णा चौधरी, देवेंद्र गांगुर्डे, पांडूरंग चौधरी, वामनतात्या चौधरी, बाळासाहेब चौधरी, पवार बापू , मंगेश चौधरी, पी. के. सुरळकर, ॲड. महेंद्र चौधरी, भास्कर चौधरी, भिका महाले, नंदु चौधरी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश चौधरी, दुर्गेश चौधरी, मनोज चौधरी, रविंद्र चौधरी, तुषार चौधरी, सुनिल चौधरी, दिलीप चौधरी, भगवान चौधरी, नेताजी पाटील, कैलास चौधरी, गुलाब चौधरी, वासुदेव चौधरी, अनिल चौधरी, विनय चौधरी यांनी परिश्रम घेतले.