मुंबई प्रतिनिधी । अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी संघर्ष मिटल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. अर्थसंकल्पाचे वेध लागलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी नवा सार्वकालीन उच्चांक गाठला आहे. सकाळ सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याने सेन्सेक्स ४२ हजार अंकापर्यंत वाढला आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी संघर्ष मिटल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात तेजी आहे. आजच्या सत्रात सन फार्मा, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, टायटन, ऍक्सिस बँक, एसबीआय, मारुती, टीसीएस हे शेअर तेजीत आहेत. एशियन पेंट, ओएनजीसी, आयटीसी, टेक महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी हे शेअर घसरले. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १७७ अंकांनी वधारून ४२०५० अंकापर्यंत वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४२ अंकांच्या वाढीसह १२,३८६ अंकांवर आहे.