रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवैध वाळू वाहतुकीवर तहसीलदार बंडू कापसे यांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे.
काल रात्री अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर जप्त करून रावेर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे. स्वराज कंपनीच्या विना नंबरच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार बंडू कापसे यांना मिळाली होती.
मध्यरात्री तहसीलदारांनी स्वतः कारवाई केली. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कठोर पावले उचलल्यामुळे तहसीलदार बंडू कापसे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या कारवायांनी वाळू वाहतूकदारांना धडा मिळत आहे.