यावल प्रतिनिधी । जिल्ह्यावर कोरोनाचे संकट असतांना आपल्या जीवाची बाजी लावून लोकहितासाठी सेवा कार्य करित कोरोनाशी दोन हात करणारे तहसिलदार जितेंद्र कुवर यांचा शहरातील छत्रपती शिवाजी महारात संस्थेतर्फे गौरव करण्यात आला
यावेळी यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बरेला, एन.एस.घोडके, विजय वाढे, सूर्यकांत पाटील, शिवानंद काकडे, वैशाली बैरागी, संगीता गावित यावेळी यावल ग्रामीण रुग्णालयातील सर्व कोरोना योध्यांचा प्रशस्तीपत्र देवुन सन्मान सत्कार करण्यात आले. तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे सन्मान करून त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या तर कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचे ही कौतुक केले. या कार्यक्रमाला संचालक किशोर माळी, हितेश गजरे, विनोद पाटील, राकेश सोनार, आशुतोष पाटील, राजेंद्र पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. देवकांत पाटील यांनी तर सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले तर भरत चौधरी यांनी आभार मानले.