एरंडोल प्रतिनिधी । येथील तहसीलदार सुचिता चव्हाण यांचा मुलगा विहान याचा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून खडके बु ॥ येथील अनाथ, नराधार मुला – मुलींच्या बालगृहात साजरा केला गेला.
वाढदिवसाच्या निमित्ताने या बालकांची भेट झाली. त्यामुळे आत्मिक समाधान लाभल्याचे तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी सांगितले. संस्थेतील बालकांनी देखील वाढदिवसाच्या निमित्ताने विहान यास शुभेच्छा दिल्या. मैत्री सेवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित जागतिक योगदिनानिमित्त सर्व बालकांनी ऑनलाईन कार्यक्रम सादर केला होता. त्या प्रमाणपत्रांचे वितरण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. वाढदिवसानिमित्त बाहेरचे काहीही न आणता बालकांसाठी वरण, भात, पोळी, मिष्टान्न असे रुचकर भोजन दिले.
कार्यक्रमासाठी परिवारातील सदस्य सागर आहेर, शरदराव चव्हाण, शुभांगी चव्हाण, अनन्या आहेर, राहुल तिवारी, अर्चना तिवारी, शशिकांत महाजन आदी उपस्थित होते. यावेळी राहुल तिवारी यांनी बालकांचे हित जोपासत नियोजन करून मोलाचे सहकार्य केले. संस्थाचालक प्रभाकर पाटील यांनी वाढदिवस संस्थेत साजरा केल्यामुळे आभार मानून विहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे, गणेश पंडीत, ज्ञानेश्वर पाटील आणि अरूणा पंडीत यांनी परिश्रम घेतले.