सावदा प्रतिनिधी । तंत्रज्ञानाला विज्ञानाची जोड देवून कला आत्मसात करून लोककल्याणास आपणाकडून देता आली पाहीज, तर लोकांना विज्ञानाचा विकास होऊन समाजमन आपणास जिंकता येते, असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले. सावदा आ.गं.हायस्कूल येथे तालुकास्तरीयविज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खा.खडसे यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, ‘प्रत्येक विद्यार्थी, पालक, नागरिकांनी विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तयार केलेले वैज्ञानिक प्रकल्प पाहूनच घरी जावे, प्रकल्प पाहिल्याने वैज्ञानिक जाणिव जिज्ञासा जागृत होऊन, यापुढे अजून कसे चांगले करता येईल याविषयी उत्सुकता वाढवावी. यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होऊन विचारांना चालना मिळते. असे सांगितले.
विविध कार्यक्रमांचे मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन
रावेर येथील पंचायत समिती यांनी आयोजित केलेले तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शन आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शन 19 डिसेंबर 2019 ला सकाळी 10.30 वाजता उद्घाटन समारंभ पार पडला. माध्यमिक विभागाचे उद्घाटन रक्षा खडसे यांच्या हस्ते पार पडला, आदिवासी विभागाचे उद्घाटन नंदू महाजन उपाद्यक्ष व नगराध्यक्षा अनिता येवले यांच्याहस्ते झाले, तर प्राथमिक विभागाचे उद्घाटन पं.स.सभापती माधुरी नेमाडे, शिक्षण सभापती रंजना भारंबे यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी जि.प.उपाध्यक्ष नंदु महाजन तसेच सोबत पं.स.सभापती माधुरी नेमाडे, नगराध्यक्षा अनिता येवले, राहूल वाघ, जि.प.सदस्या रंजना पाटील, पं.स.सदस्य योगिता वानखेड़े, प्रतिभा बोरोले, जुम् तडवी, नगरसेवक रंजना भारंबे, नंदा लोखंडे, मिनाक्षी कोल्हे, विजयाताई जावळे, सिमरन वानखेडे, राजेश भंगाळे, ग.वि.अ नाकाडे, गटशिक्षणाधिकारी तडवी, मुख्याध्यापक सी.सी.सपकाळे सर, तुकाराम बोरोले सर इ.तसेच शिक्षक वृंद व बाल वैज्ञानिक उपस्थित होते. आभार संजय महाजन यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी केले.
प्रदर्शनाचा समारोप
प्रदर्शनाचा समारोप दुपारी 3 वाजता करण्यात आला. जि.प. शिक्षण सभापती पोपट भोळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमाणपत्र वितरण शबाना मुराद तडवी उपनगराध्यक्ष सावदा यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी राम पाटील, दीपक मगरे, मती मनीषा चौधरी यांच्यासह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सर्व सन्माननिय नगरसेवक, विविध पदाधिकारी पं.स. चे शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी हे उपस्थित होते.