यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील दोणगाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे शाळेच्या पहील्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना निशुल्क गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
या कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद जळगाव सौ.सरला पाटील, यावल तालुका गटशिक्षणाधिकारी नईम शेख दोणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.आशाताई सुरेश पाटील,उप सरपंच मनोहर पाडुरंग भालेराव ग्राम पंचायत सदस्य माधुरी विलास कोळी,शांताराम अरुण पाटील, शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सदस्य, शिक्षक, पालकवर्ग व विद्यार्थ्यांनसह ग्रामस्थ मंडळी देखील मोठया संखेत उपस्थीत होते.
यावेळी उपस्थित पालकांचे व विद्यार्थ्यांचे शिक्षकांच्या वतीने स्वागत करण्यात आले .