जळगाव, प्रतिनिधी | न.पा., मनपा शाळांकडे लोकांचा पहाण्याचा दुष्टीकोण बदलण्यासाठी शिक्षकांनी विविध उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अर्जुन कोळी यांनी केले. महापालिकेतर्फे मनपा शाळेतील शिक्षक-मुख्यध्यापकांसाठी गुणवत्ता पुर्ण शिक्षणाचे धडे देण्यासाठी शुक्रवारी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त अजित मुठे, प्रशासन अधिकारी श्री. रामोळे, विवेक अडवाणी आदी उपस्थित होते.
मनपा शाळेतील शिक्षक-मुख्यध्यापकांसाठी गुणवत्ता पुर्ण शिक्षणाचे धडे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षण सभापती सचिन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यशाळेला कराड येथील आदर्श शिक्षक अर्जून कोळी यांचे मार्गदशन लाभले. श्री. कोळी पुढे म्हणाले की, पालक सभा घेवून पालकांना आपल्या शिक्षण पद्धतीचे महत्व पटवून दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अर्जून कोळी यांनी कराड नगरपालिकेच्या शाळेत गुणवत्तापुर्ण शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली व १३० विद्यार्थी असलेल्या शाळेची पटसंख्या २००० विद्यार्थ्यां पोहचवली. त्यांनी जळगाव महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांना गुणवत्ता पुर्ण शिक्षणाविषयी विविध टीप्स देवून मार्गदशन केले. या कार्यशाळेला ३५ माध्यमिक शिक्षकांसह मराठी व उर्दु २०० मनपा शिक्षक उपस्थित होते. दरम्यान उपायुक्त अजित मुठे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, यशस्वी होणारे व्यक्ती वेगळे काही करीत नाही मात्र, ते कोणतेही काम करतांना वेगळ्या पध्दतीने करीत असतात असे मत व्यक्त केले. तसेच वेगळ्या व्यक्तमत्वाचे उत्तम उदाहरण अर्जून कोळी यांच्या माध्यमातून आपल्या समोर उभे असल्याचेही उपायुक्त मुठे यांनी सांगितले. दरम्यान, शिक्षक संदीप बांगर, सौ. कापसे, सौ. पगारे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरिषचंद्र सोनवणे यांनी तर, आभार विवेक अडवणी यांनी मानले. अर्जून कोळी यांनी स्कॉलरशिपमध्ये यादीत आलेल्या विद्यार्थ्यांला १० हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले.