बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळेसह कुडे विद्यालयात शिक्षकदिन उत्साहात

क

 

धरणगाव प्रतिनिधी । येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा आणि सारजाई कुडे विद्यालयात आज दि. 5 सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीसह शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, संस्थेचे सचिव प्रा.रमेश महाजन व संचालक रघुनाथ चौधरी व सकाळ सत्रातील डी.एन.चौधरी यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील, जेष्ठ शिक्षक किशोर चौधरी यांच्यासह इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांनी आपाआपले मनोगत व्यक्त केले. डी.आर.चव्हाण यांनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा म्हणून घेतली. तृप्ती पाटील यांनीही माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परमेश्वर रोकडे आणि पल्लवी मोरे यांनी केले, तर आभार ए.एच.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.

Protected Content