अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव-सोनवद रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. प्रमोद नारायण पाटील (३२ रा. आर्थे खुर्द, ता. शिरपूर, जि. धुळे, ह.मु.चिंतामण मोरयानगर धरणगाव) असे मृत शिक्षकाचे आहे. ते धरणगाव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात शिक्षक होते.

मिळालेली माहिती अशी की, धरणगाव-सोनवद रस्त्यावर सोनवद रस्त्यावरील तरडे गावाजवळ अज्ञात वाहनाने प्रमोद पाटील यांना धडक देऊन पसार झाला. सकाळी ते जनार्दन पाटील यांच्या शेतात त्यांच्या मोटरसायकलीसह (एमएच १९ सीडी ९२८३) मयत अवस्थेत आढळून आले. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलिस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी सकाळी आठ वाजता फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन धरणगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. प्रमोद नारायण पाटील हे बालकवी ठोंबरे विद्यालयाचे मनमिळाऊ स्वभावाचे शिक्षक होते. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा-एक मुलगी असा परिवार आहे.

Protected Content