रावेर, प्रतिनिधी | रावेर शहरात मध्यरात्री ट्रक व टाटा मॅजिकची धडक झाल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली असून याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, मध्य प्रदेशकडून रात्री सव्वा बाराच्या सुमारास ट्रक (एचआर ५५ डब्लू ११९६) जळगावच्या दिशेने जात असतांना समोरुन येणारी टाटा मॅजिक(एमएच १९ बी ९९९७) यांची समारो-समोर धडक झाली. यात टाटा मॅजिक ड्रायव्हर प्रदीप तुकाराम पाटील (रा. कुसुंबा, जळगाव) हा जखमी झाला आहे. ट्रक ड्रायव्हर दिपु करंनसिंग बघेल (रा. शिवपुर, मध्यप्रदेश) हा चालवीत होता. याबाबत प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.