Home क्राईम यावल येथे तरूणीचा विनयभंग; एकावर गुन्हा

यावल येथे तरूणीचा विनयभंग; एकावर गुन्हा


crime

यावल (प्रतिनिधी)। येथील विस्तारीत परिसरातील गणेशनगर कॉलनीत एका तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरूथ्द पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील गणेशनगर कॉलनीत राहणारी फिर्यादीचे वडील घरी नसतांना तरूणी ही आपल्या दोन बहीणी सोबत घरात होती. शुक्रवारी २१ जुन रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरासमोर अंगणात झाडण्याचे काम करीत होती. असतांना दिपक उर्फ विनोद सुरेश पाटील यांने दारूच्या नशेत फिर्यादी तरुणीशी वाद घालुन हात पकडुन लज्जा वाटेल असे कृत केले. याबाबत तरूणीने फिर्याद दिल्याने यावल पोलीसात दिपक उर्फ विनोद सुरेश पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि सुजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.


Protected Content

Play sound