Home Cities जळगाव तरुण कुढापा मंडळाचा गणेशोत्सव पाटपूजन सोहळा उत्साहात !

तरुण कुढापा मंडळाचा गणेशोत्सव पाटपूजन सोहळा उत्साहात !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुने जळगाव परिसरातील नेरी नाका येथील सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या तरुण कुढापा मंडळाच्या गणेशोत्सव २०२५ च्या पाटपूजन सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मंडळाचे हे ६२ वे वर्ष असून, त्यांची धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरी नेहमीच कौतुकास्पद राहिली आहे.

या पाटपूजन सोहळ्याला शहराचे आमदार राजुमामा भोळे, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, विश्व हिंदू परिषदेचे ललित चौधरी, माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे, सार्वजनिक गणेश महामंडळाचे दीपक जोशी, डॉ. निलेश चांडक, उद्योगपती नंदू चौधरी, सामाजिक कार्यकर्ते पीयूष कोल्हे, पीयूष नरेंद्र पाटील, बंटी भारंबे, भारत बेंडाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यंदाच्या पाटपूजनाचा मान मयूर रमेश धनगर आणि सौ. सपना मयूर धनगर यांना मिळाला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुरळकर यांनी केले, तर विशाल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

तरुण कुढापा मंडळ हे नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक कामांमध्ये अग्रेसर असते. मंडळाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष दीपक मराठे, उपाध्यक्ष निवृत्ती पाटील यांच्यासह राजेंद्र पाटील, सतीश ठाकुर, शंभू भावसार, भोजराज बारी, नारायण कोळी, पंकज भावसार, बंटी चौधरी, अनिल चौधरी, रवींद्र माळी, चेतन चौधरी, राहुल कोळी, मोहित पाटील, जयेश अत्तरदे, विकी ठाकूर, जयेश कोल्हे, हरीश चौधरी, सुमित सपकाळे, गौरव सोनार, निलेश माळी, यश मराठे, रोहन कोल्हे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound