Home क्राईम गळफास घेवून तरूणाची आत्महत्या

गळफास घेवून तरूणाची आत्महत्या


hangging

जळगाव प्रतिनिधी। धरणगाव तालुक्यातील शेरी येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन 25 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रोहिदास वामन सोनवणे (वय-२५) रा. शेरी ता. धरणगाव हा आपल्या कुटुंबीयासोबत राहतो. शेतातील कामे आणि हातमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी पहाटे गावातील एका शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास हा प्रकार नागरीकांच्या लक्षात आला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीसांच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्किय अधिकारी यांनी त्याला मयत घोषीत केले. याप्रकरणी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound