अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवानवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये संमेलन होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली येथील ताल कटोरा स्टेडियम येथे संमेलन होणार आहे.महामंडळ अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली. तीन दिवसीय संमेलनात ग्रंथ दिंडी, ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शन आणि संमेलन उद्घाटन होणार आहे. याखेरीज दोन कविसंमेलने आणि आठ परिसंवाद व प्रगट मुलाखत होणार आहे. कविसंमेलनात निमंत्रित आणि बहुभाषिक असे असणार आहेत.

परिसंवादात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. त्यात देशाचे राजकारण आणि मराठी साहित्य, मराठी आणि महाराष्ट्र धर्म, कृत्रिम बुद्धिमत्ता व सर्जनशीलता, मराठीचा अमराठी संसार, अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. महामंडळाच्या बैठकीसाठी पदाधिकारी उपस्थित होते. अंमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या संमेलनास नियोजित खर्चापेक्षा अधिक खर्च आला असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली.

Protected Content