जळगाव प्रतिनिधी । शिवसेनेचे नेते माजी आमदार चिमणराव पाटील यांची तापी पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आज उपाध्यक्षपदाचा पदभार स्विकारला.
तापी महामंडळाच्या उपाध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर दिलेल्या पदाचा उपयोग करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा सदैव प्रयत्न करेन. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे काम मी करणार आहे. यात नार-पार प्रकल्प, पद्मालय, पाडळसे, तसेच सात बलून बंधारे या कामांना प्राध्यान्याने पुर्ण करण्याचे आश्वासन माजी आमदार चिमणराव पाटील यांनी ‘लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज’शी बोलतांना दिले.
यावेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळ विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. यथायोग्य न्याय दिल्याबद्दल आमचे आधारस्तंभ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सर्व शिवसेना नेते व उपनेते यांचे यानिमित्त चिमणराव पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे.