कपिलेश्वर मंदिरावर तापी जन्मोत्सव साजरा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील कपिलेश्वर येथे सुर्यकन्या तापी जन्मोत्सव तापी पांजरा गुप्त कपिलगंगा या त्रिवेणी संगम कपिलेश्वर मंदिरावर साजरा करण्यात आला.खानदेश गंगा तापिनी,सत्या, सावित्री,तारा,अशा सुमारे २१ प्रकारच्या नावाने संबोधल्या जाणाऱ्या तापी नदी “प्रकट” दिन आषाढ़ शुक्ल पक्ष सप्तमी शनिवार श्री. क्षेत्र कपिलेश्वर मंदिर देवस्थान तापी पांझरा जवळील संगमावर मोठ्या अध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

शिंदखेडा, अमळनेर तालुक्यातील मुडावद निम तापी काठावरील पुरातन तापी मातेचा महाभिषेक करण्यात आला.यावेळी मुख्य यजमान पदी निम गावाचे तलाठी श्री जोगी जितेंद्र नाथ यांनी सपत्नीक तापी मातेस साडी- चोळी अर्पण करुण विधिवत मंत्रोच्चारण घोषात नदीचे पुजन केले. महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराजच्या मार्गदर्शना खाली, महेश महाराज,व आचार्य राकेश शर्मा जी यांनी यावेळी पौरहीत्य केले. यावेळी संस्थांचे उपाध्यक्ष, सी. एस. पाटील, गामा ताथ्या, चंपालाल पाटील नाना, मंगल पाटील, दिनेश पाटील , दादाभाई धनगर, रघुआबा पाटील, पाठशालाचे विद्यार्थी बाल गोपाल, व परिसरातील भक्तगण मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

Protected Content