जळगाव, प्रतिनिधी | शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत दोन दिवशीय जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपण भाजपमध्ये राहू असे गृहीत धरू नका, असा स्पष्ट इशारा दिल्यानंतर सावंत यांच्या अचानक जिल्हा दौऱ्यावर येण्याने सर्वत्र चर्चांचे उधाण आले आहे. यातच नाथाभाऊ समर्थक गुरुमुख जगवाणी यांनी सावंत याचे विमानतळावर स्वागत केल्याने खडसे शिवसेनेत प्रवेश करतील, या चर्चेला पाठबळ मिळत आहे.
महाआघाडी निर्माण झाल्यानंतर जिल्ह्यात ज्या-ज्या निवडणुका येणार आहेत, त्यांची चाचपणी व पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेण्यासाठी आपला हा दौरा असल्याची माहिती संजय सावंत हे जळगावात आले असतांना त्यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. या दौऱ्या दरम्यान, काही लोकांशी त्याच्या भेटी झाल्या असल्याचे सूचक उत्तर सावंत यांनी यावेळी दिले. नाथाभाऊच्या प्रवेशासंदर्भात त्यांच्याशी काही चर्चा झाली का ? या प्रश्नाला उत्तर देतांना सावंत म्हणले की, त्यांचीशी वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू असून त्यांचाशी प्रत्येकक्ष भेट झाली नसल्याचे सांगितले. जिल्ह्यातील इतर पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्याच्या वृत्तासही सावंत यांनी दुजोरा देत सांगितले की, काही दिवसानंतर बऱ्याच व्यक्ती आमच्याच्या सोबत दिसतील. इतर पक्षातील अनेक नेत्यांनी भेटीत आपण शिवसेनेत येण्यास उत्सुक असल्याचे सांगितल्याचे सूचक व्यक्तव्यही त्यांनी केले. या नेत्यांनी त्यांची नावे सध्या कुठे चर्चेत आणू नका, अशी विनंती केली असून योग्यवेळी योग्य व्यक्ती पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करेल, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.