शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवरून चर्चा ; काँग्रेसचे नेते मुंबईसाठी रवाना

pawar sonia

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची फोनवरून चर्चा झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मुंबईसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे सत्तेचा तिढा लवकरच सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती के सी वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. यानंतर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यात अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि के सी गोपाल स्वत: शरद पवार यांच्याशी पुढची चर्चा करणार असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Protected Content