
अमळनेर (प्रतिनिधी) 2005 पूर्वी सेवेत असलेल्या व 2005 नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या माध्यमिक शाळा व तुकड्यांवर काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शासनस्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा करणार असल्याचे पदमभूषण आणा हजारे यांनी सांगितले आहे. अहमदनगर जिल्हा जुनी पेन्शन कृती समितीच्या शिष्टमंडळाशी राळेगणसिद्धी येथे चर्चा करताना हे आश्वासन दिले आहे.
यावेळी अण्णा म्हणाले की, जीआर प्रमाणे 2005 पूर्वी शासनाच्या सेवेत असलेल्या सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना चालू असताना फक्त अनुदानाच्या निकषावर शासन पेन्शन योजनेपासून 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना वंचित ठेवू शकत नाही. यावेळी अण्णांनी लोकप्रतिनिधीमार्फत देखील विधिमंडळात या प्रश्नावर आवाज उठवला. तसेच जून महिन्यात मुंबईत आझाद मैदानांवर होणाऱ्या आंदोलनाला पद्मभूषण अण्णा हजारे यांनी पाठींबा दिला आहे.
अहमदनगर जिल्हा जुनी पेन्शन कृती समितीने आज पद्मश्री अण्णा हजारे यांचे बरोबरच विधानसभेचे उपाध्यक्ष ना. विजय औटी यांची भेट घेऊन पेन्शन योजनेसंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी जिल्हा कृती समितीच्या वतीने शिक्षकनेते आपासाहेब शिंदे, चंद्रकांत चौगुले,राजेंद्र कोतकर,महेंद्र हिंगे,सुनील दानवे,संजय भुसारी,सुनील भोर,संजय इघे,बद्रीनाथ शिंदे,रमाकांत दरेकर,श्रीगोंदा सुनील भोर, बंडू मखरे, देवराव दरेकर, देविदास खेडकर, सतीश गांजुरे, दीपक धारकर.,एकनाथ सोनवणे,रामराव होन ,आनंदा बर्डे ,राजेंन्र्द जाधव , बाळासाहेब गावडे, बबन लांडगे , विशाल तागड, जाधव बापू , तनपुरे कल्याण , कोहकडे केशव, पठाण सर, शिंदे सर,उपस्थित होते.