Home धर्म-समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा रावेरात गौरव; शेती ते आयटी, सर्वत्र संधीच संधी – माजी...

गुणवंत विद्यार्थ्यांचा रावेरात गौरव; शेती ते आयटी, सर्वत्र संधीच संधी – माजी आ. अरुण पाटील


रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून करिअर घडवावे. फक्त सरकारी नोकरीच नव्हे तर शेती, व्यवसाय, आयटी, उद्योग आदी सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगतीसाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार अरुण पाटील यांनी केले. ते रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

मराठा मंगल कार्यालय, रावेर येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व फोटो अनावरणाने झाली. या वेळी मंचावर समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी शिक्षणात स्पर्धा ठेऊन कोणताही हेवेदावा न ठेवता आपल्या क्षेत्रात प्रगती करावी, असे आवाहन अरुण पाटील यांनी उपस्थितांना केले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि समाजासाठी प्रेरणा ठरण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात जे. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राकडे वळण्याचे आवाहन करताना वेगवेगळ्या कौशल्याधारित कोर्सेस करून नवनवीन रोजगाराच्या संधी शोधण्याचे महत्त्व सांगितले. कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगरचे प्राचार्य संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीच्या संधी व तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल मार्गदर्शन केले.

या गौरव समारंभात डॉ. एस. आर. पाटील, नितीन पाटील नेहता, दिलीप पाटील, आर. बी. महाजन, व्ही. व्ही. पाटील, व्ही. पी. महाजन, विलास ताठे, संतोष पाटील, अजबराव पाटील, ॲड. ए. जे. पाटील, युवराज महाजन (बी. डी. मार्ट) व इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी आणि महिलांनीही मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

समारंभात मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा संदेशही वाचून दाखवण्यात आला. मुंबई येथे २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा आरक्षण मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन या संदेशातून करण्यात आले.


Protected Content

Play sound