न्यायालयात साक्ष देण्यास आलेल्या महिला तलाठीचा विनयभंग

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२१ मध्ये वाळू चोरी संदर्भात दाखल गुन्ह्याबाबत भुसावळ शहरातील सत्र न्यायालयात साक्ष देण्यास आलेल्या महिला तलाठीचा संशयित आरोपीने अंगावरून हात फिरवत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी कीख्, फेब्रुवारी २०२१ मध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महिला तलाठी यांनी पकडला होता. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात महिला तलाठी या शुक्रवारी २० डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता भुसावळ सत्र न्यायालयात साक्ष देण्यास आल्या होत्या. यावेळी संशयीत सुनील विश्वनाथ भोई (रा.साकेगाव, ता.भुसावळ) याने महिला तलाठी यांच्या पाठीवरून हात फिरवत विनयभंग केला. यप्रकरणी दुपारी साडेतीन वाजता महिला तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी सुनील भोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पालवे पुढील तपास करीत आहे.

Protected Content