भुसावळ, प्रतिनिधी | वरणगावजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धीरज दगडू ढेकणे यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. धीरज ढेकणे हे मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा काकोडा येथे तलाठी म्हणून कार्यरत होते.
मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील रहिवासी धीरज ढेकणे हे रजेवर गावी गेले होते. रजा संपल्याने पुन्हा सेवेवर हजर होण्यासाठी नगर तालुक्यात कुरा काकोडा येथे कारने जात असतांना आज सकाळच्या सुमारास वरणगाव नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ट्रकने ढेकणे यांच्या कारला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कु-हा काकोडा परिसरात लोकप्रिय तलाठी म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या मनात जागा निर्माण केली होती. त्यांचा जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.धीरज ढेकणे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.