तक्रार लिहून न घेणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

 

जळगाव प्रतिनिधी । मतदान केंद्राच्या खोलीत अंधार असल्याने वयोवृध्दांना पसंतीचा उमेदवाराला मतदान न करता आल्याने तक्रार करण्यासाठी आलेल्या तक्रारदार यांना मोठ्या आवाजात बोलून तक्रार लिहून घेतली नाही. तक्रार लिहून न घेणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यावर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनामार्फत तक्रारदार यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार संतोष ढिवरे यांची आई जळगाव लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 302 वरील खोली क्रमांक 6 येथे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले होते. या खोलीत पुर्णपणे अंधार असल्याने वयोवृद्ध नागरिकांना मतदारांना आपल्या पसंतीचा चिन्ह दिसत नव्हता. तसेच वयोवृध्दांना मतदान करतांना आपल्या पसंतीच्या उमेदवारास मतदान करता आले नाही. याबाबत तक्रारदार यांनी उपस्थित असलेल्या क्षेत्रीय अधिकारी एस.एन.तडवी यांना भेटून सविस्तर महिती दिल्यानंतर त्यांनी तक्रारदार ढिवरे यांना उच्च आवाजात बोलून नियम आणि अटी सांगून त्यांना तक्रार करण्यासाठी 500 रूपये ठेवावे लागता असे सांगून तक्रार पुस्तकार नोंद घेण्यास नकार दिला. क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदारांची कुठलीही समस्या न सोडवता त्यांना मोठ्या आवाजात अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना तक्रारदार संतोष ढिवरे यांनी केली आहे.

Add Comment

Protected Content