मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या हातातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने कापून चोरून नेल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर शहरातील रेणूका नगरात राहणारे अनिल माणिकराव पाटील यांची आई सिंधुबाई पाटील या उपचारासाठी बुधवारी ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जळगावला जाण्याकरिता बसमध्ये चढत होत्या. याच वेळी बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय आणि अत्यंत चतुराईने डाव्या हातातील सोन्याची बांगडी कट करून लंपास केली. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. याप्रकरणी अनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुरेश मेढे हे करीत आहे.




